तब्बल १०० दिवसांनी झाली सुटका; देशमुख-मलिक अद्याप गजाआड
मुंबई, दि. ९ : शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना अखेर गुरुवारी पीएमएलए कोर्टाने जामीन मंजूर करून मोठा दिलासा दिला आहे. मुंबईतील पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना ईडी ने अटक केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांना पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पाशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात १ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर राऊत यांनी जामीनासाठी अनेकवेळा न्यायालयात धाव घेतली मात्र त्यांना जामीन मिळाला नाही. पण आज अखेर राऊत यांना जमीन मिळाल व एकाएकी शिवसैनिकांत जोश संचारला.
कोर्टाने संजय राऊत यांना जमीन मंजूर ब केल्यानंतर कोर्टाच्या आवारात जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवत या निर्णयाचं स्वागत केलं. या प्रकरणाबाबत तपास यंत्रणेने न्यायालयात सांगितले की, या घोटाळ्याच्या एकूण पैशातून संजय राऊत यांना २७ कोटी रुपये मिळाले आहेत. राऊत त्यांचे सहकारी प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून पडद्याआड काम करत होते. ईडीची चौकशी राऊत यांच्या पत्नी आणि सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारातील कथित आर्थिक अनियमिततेशी संबंधित आहे. राष्ट्रवादि कोंग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री नवाब मलिक हे अद्याप आर्थर रोड तुरुंगात आहेत
