जलजीवन मिशन अंतर्गत देशभरातील ‘एवढ्या’ घरांना मिळाली नळजोडणी
ग्रामीण भागातल्या ४ कोटी कुटुंबांना नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करत जलजीवन मिशनने नवीन टप्पा पार केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.
सध्या ७ कोटी २४ लाख, म्हणजे एक तृतीयांशहून अधिक घरांना नळजोड पुरवण्यात आले आहेत. प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात गोव्याला सर्व प्रथम यासह आले असून त्यानंतर तेलंगण आणि अंदमान-निकोबार प्रशासनानंही हे लक्ष्य साध्य केले आहे.
