Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

इस्रोने कडून उपग्रह प्रक्षेपण वाहन SSLV-D१ चं य़शस्वी प्रक्षेपण

इस्रोने कडून उपग्रह प्रक्षेपण वाहन SSLV-D१ चं य़शस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने आज त्यांचे छोटे उपग्रह प्रक्षेपण वाहन SSLV-D१ लाँच केलं. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी ९.१८ वाजता हे वाहन प्रक्षेपित करण्यात आलं. SSLV-D१ रॉकेटने पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-०२ आणि आणखी एक छोटा उपग्रह आझादी सॅट  वाहून नेला, जो स्पेस किड्स इंडियाच्या  विद्यार्थ्यांनी विकसित केला आहे.

देशातील ७५ ग्रामीण सरकारी शाळांमधील ७५० तरुण विद्यार्थिनींनी ७५ पेलोड्सचा समावेश असलेला आझादीसॅट’ तयार केला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि तरुण मुलींना त्यांचं करिअर म्हणून अवकाश संशोधन निवडण्याच्या संधी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प, ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या वर्षाची खास संकल्पना ठेवण्यात  आली आहे.

श्रीहरिकोटा येथे प्रक्षेपणानंतर बोलताना इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले, SSLV – D१ मोहिमेचे तीन टप्पे पूर्ण झाले असून  SSLV-D१ ने सर्व टप्प्यांवर अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली आहे.  मिशनच्या अंतिम टप्प्यात, काही डेटाचे नुकसान होत असून स्थिर कक्षा गाठण्याच्या संदर्भात मोहिमेचा अंतिम परिणाम सांगण्यासाठी  डेटाचं विश्लेषण करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *