गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत मालवाहतुकीचे उत्पन्न १६% ने वाढले आहे
डिसेंबर २०२२ पर्यंत रेल्वेने ११०९.३८ मेट्रिक टन मालवाहतूक केली
मुंबई/नवी दिल्ली, दि. २: गेल्या वर्षी केलेल्या मालवाहतुकीच्या तुलनेत यावर्षी ८% म्हणजे १०२९.९६ मेट्रिक टन वाढ झाली आहे. भारतीय रेल्वेच्या मालवाहतुकीने, मिशन मोडनुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यांत गेल्या वर्षीच्या याच कालावधीत मिळवलेल्या उत्पन्नाची मर्यादा ओलांडली. एप्रिल ते २०२२ डिसेंबर या कालावधीत रेल्वेने एकत्रित आधारावर ११०९.३८ मेट्रिक टन मालवाहतूक केली, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ८% नी जास्त आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत रेल्वेने १०२९.९६ मेट्रिक टन मालवाहतूक केली होती. गेल्या वर्षीच्या १,०४,०४० कोटी रुपयांच्या तुलनेत रेल्वेने यावर्षी १,२०,४७८ कोटी रुपयांची कमाई केली आहे जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत १६% नी जास्त आहे.
डिसेंबर २०२२ या महिन्यात १३०.६६ मेट्रिक टन मूळ मालवाहतूक केली जी मागच्या वर्षीच्या तुलनेत ३% नी जास्त आहे. डिसेंबरमध्ये २०२१० मध्ये १२६.८ मेट्रिक टन इतकी मूळ मालवाहतूक झाली होती. मालवाहतुकीचा महसूल डिसेंबरच्या २०२१ त्या मालवाहतुकीच्या १२,९१४ कोटी रुपये कमाईच्या तुलनेत १४,५७३ कोटींची कमाई झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत १३% ने वाढलेली आहे. “हंग्री फॉर कार्गो” या मंत्राला अनुसरून, भारतीय रेल्वेने व्यवसायात सुलभता आणण्यासाठी तसेच स्पर्धात्मक किमतीत सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत ज्यामुळे पारंपरिक आणि अपारंपरिक अशा दोन्ही प्रकारच्या व्यापार वस्तू प्रवाहातून रेल्वेकडे नवीन वाहतुकीचा ओघ येत आहे. ग्राहक केंद्रित दृष्टीकोन आणि लवचिक धोरण बनवण्याद्वारे समर्थित व्यवसाय विकास घटकांच्या कार्यामुळे रेल्वेला हे महत्त्वपूर्ण यश साध्य करण्यासाठी मदत झाली.
