Pakistan Tweet 3
भारतीय हवाई दलाने केलेल्या हल्लाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल
जम्मू काश्मीर मधील पुलवामा भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर आज पहाटे भारतीय वायू सेनेने पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केला. भारताच्या लढाऊ मिराज २००० या विमानाने एलओसी पार करून दहशतवादी तळांवर १ हजार किलो बॉम्ब टाकले. दरम्यान, भारताने केलेल्या या हल्ल्याचे काही फोटो खुद्द पाकिस्तानकडून सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. पाकिस्तानचे मेजर जनरल गफूर यांनी भारताने केलेल्या बॉम्ब हल्ल्याचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.
Payload of hastily escaping Indian aircrafts fell in open. pic.twitter.com/8drYtNGMsm
— DG ISPR (@OfficialDGISPR) February 26, 2019
