Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

पुण्यात मूकबधिरांवर पोलिसांचा लाठीमार, सर्व स्तरावरून टीका

पुण्यात मूकबधिरांवर पोलिसांचा लाठीमार, सर्व स्तरावरून टीका

पुणे : आपल्या विविध मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या मूकबधिर आंदोलकांवर सोमवारी पोलिसांनी थेट लाठीमार केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली. यात काही मूकबधिर आंदोलक जखमी झाले असून अनेकांना पाय, गुडघे, पाठ व डोक्याला मार बसला आहे. या घटनेचा राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे.

मनसे प्रमुख राज ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलकांची भेट घेतली. आंदोलकांशी चर्चा करून त्यांनी सरकारवर जोरदार टीकाही केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांना यात लक्ष घालण्यास सांगितले असता मंगळवारी पहाटेच्या सुमारास सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *