भारत-चीन सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर १९ जूनला पंतप्रधानांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
नवी दिल्ली: सोमवारी मध्यरात्री लडाख येथील पर्वतरांगांमध्ये गॅलवान भागात भारत व चीनचे सैनिक एकमेकांना भिडले होते. यावेळी भारताचे २० सैनिक हुतात्मा झाले तर चीनचेही ३० पेक्षा अधिक सैनिक मृत्युमुखी पडले. यावरून देशात सध्या संतापाचे वातावरण असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ह्याबाबत कठोर पावले उचलण्याचे सूतोवाच दिले आहेत.
भारत व चीन सीमेवरील वादाच्या पार्श्वभूमीवर येत्या १९ जून रोजी सायंकाळी पाच वाजता सर्व पक्षीय ऑनलाइन बैठकीचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या आभासी बैठकीस विविध राजकीय पक्षांचे अध्यक्षही थेट सहभागी होऊ शकणार आहेत. महाराष्ट्रातून या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ही सदर सहभागी होण्याची शक्यता आहे.
