प्राप्तीकर विभाकडून येत्या सात जूनपासून करदात्यांसाठी ई-फायलिंग पोर्टल सुरू होणार
प्राप्तीकर विभाग, येत्या सात जूनपासून ‘www.incometax.gov.in’ हे नवीन ई-फायलिंग पोर्टल सुरू करणार आहे. करदात्यांना आधुनिक सुविधा देण हा यामागचा उद्देश आहे.
प्राप्तीकर परताव्याची प्रक्रिया वेगानं पूर्ण करून करदात्यांना त्वरित परतावा देण्यासाठी हे पोर्टल विकसित करण्यात आलं आहे. प्राप्तीकरदात्यांच्या मदतीसाठी नवीन कॉल सेंटरही तयार करण्यात आलं आहे.
नवीन पोर्टल सुरू झाल्यानंतर सध्याचं ‘www.incometaxindiaefiling.gov.in’ हे पोर्टल वापरता येणार नाही. त्यामुळे करदात्यांनी सध्याच्या पोर्टल वरून १ जून च्या आधीच आपली कामं पूर्ण करून घ्यावीत असं प्राप्तीकर विभागानं म्हटलं आहे.
व्यक्तिगत प्राप्तीकर विवरण पत्र दाखल करण्यास ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारनं वर्ष २०२१-२२ साठी व्यक्तिगत प्राप्तीकर विवरण दाखल करण्याची मुदत, ३१ जुलै ऐवजी वाढवून, आता ३० सप्टेंबर केली आहे. अर्थ मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन ही मुदत वाढ देण्यात आली आहे. कंपन्यांनाही ३१ ऑक्टोबर ऐवजी, ३० नोव्हेंबर पर्यंत प्राप्तीकर विवरण भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात आली असल्याचं, मंत्रालयानं म्हटलं आहे.
दरम्यान, प्राप्तीकर विभाग करदात्यांसाठी येत्या सात जून रोजी नवीन पोर्टल सुरु करणार आहे. या पोर्टलवरुन करदात्यांना विवरणपत्र भरणं आणि अन्य प्राप्तीकरविषयक कामं अधिक सुलभ होणार आहेत.
