IMRAN-ABHI
भारतीयांसाठी खुशखबर, विंग कमांडर अभिनंदन यांची उद्या होणार सुटका
भारताला मोठे यश; भारतीय वैमानिक अभिनंदन उद्या मायदेशात परतणार : इम्रान खान यांची घोषणा
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारताचे विंग कमांडर अभिनंदन उद्या भारतात परतणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी संसदेत त्यांच्या सुटकेची घोषणा केली. आम्हाला युद्ध नको शांती हवी आहे, असे नमूद करत भारताच्या विंग कमांडरला मायदेशी परत करण्याची घोषणा केली. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.
भारताने पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला करून ३५० दहशतवाद्यांचा खात्मा केला. या कारवाईनंतर पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी करून भारतीय लष्करावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईला भारतीय हवाई दलाने हाणून पाडले. पाकिस्तानचे लढाऊ विमान एफ-१६ ला पाडण्यात आले.
प्रत्युत्तराच्या कारवाईमध्ये भारताचे सुद्धा मिग २१ लढाऊ विमान कोसळले. या कोसळलेल्या फायटर विमानाचे विंग कमांडर बेपत्ता झाले होते. पाकिस्तानने विंग कमांडर आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला. यानंतर त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु झाले होते. भारताच्या प्रयत्नांना अखेर यश आले
