Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बायको चिडली मग बनवा इडली …..

Idli-sambar

बायको चिडली मग बनवा इडली …..

३० मार्च हा दिवस जगभरात इडली दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त जाणून घेऊया ‘रवा इडली’ कशी बनवायची ते…

इडली :

साहित्य: ३ वाटया तांदूळ, १ वाटी उडीद डाळ, ३ चमचे दही, खायचा सोडा पाव चमचा, थोडेसे तेल, चवीपुरते मीठ

कृती :
प्रथम तांदूळ व उडीद डाळ धुऊन वेगवेगळे भिजत टाकवे. आठ ते नऊ तासानंतर ते मिक्सरमधुन बारीक वाटून घ्यावे. नंतर त्यात दही टाकून ते पीठ आंबवून घ्यावे. इडली करण्याच्या वेळी त्यात थोडा सोडा व चवीनुसार मीठ टाकावे व ते मिश्रण ढवळून घ्यावे. यानंतर इडली पात्रात पीठ घालुन मोठ्या आचेवर कुकरमध्‍ये ठेवुन साधारण २० मिनीटे वाफवावे. वर दिलेल्या प्रमाणात साधारण ४०-४५ इडल्या होतात.

सांबार :

साहित्य: तुरडाळ, १ टोमॅटो, १ कांदा, सांबार मसाला, चिंच, चवीप्रमाणे मीठ, लाल- तिखट चवीप्रमाणे, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, २-३ लाल सुक्या मिरच्या.

कृती :

प्रथम एक भांड्यात डाळ, टोमॅटो, कांदा कुकर मध्ये एकत्र शिजवुन घ्यावा. शिजल्यावर कांदा, टोमॅटो आणि थोडी डाळ मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्यावी. उरलेली डाळ घोटुन त्यात वाटलेले मिश्रण घालावे. गरजेप्रमाणे पाणी घालावे आणि एका जाड बुडाच्या पातेल्यात हे मिश्रण उकळण्यासाठी ठेवावे. त्यात मीठ, तिखट, सांबार मसाला, चिंचेचा कोळ घालावा. उरलेला कांदा पातळ उभा कापुन उकळत्या सांबारमधे घालावा. सांबार उकळत आले की तेलात जिरे, मोहोरी, हिंग, कढिपत्ता, लाल मिरच्या घालुन फोडणी करुन त्यात ओतावी. एक उकळी आणुन गॅस बंद करावा.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *