भारतीय हवाई दलाचा खुलासा, अभिनंदन यांच्या नावे फेक सोशल मीडिया अकाउंट्स
गेले काही दिवस सोशल मीडियावर विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांच्या नावाने बरेच फेक अकाउंट बनवले जात आहेत आणि त्यावर त्यांच्या नावाने वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहेत. किंबहुना गेल्या आठवड्यात आमच्याकडूनही अनवधानाने अशा अकाउंट ला फॉलो करण्याची चूक झाली. पण आज भारतीय हवाई दलाने एक ट्विट करून त्या संदर्भातला खुलासा जाहीर केला आहे. हवाई दलाने आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की, “विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे कोणत्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम) अकाउंट नाही. कृपया अशा अफवा पसरवणाऱ्या फेक अकाउंट ला फॉलो करू नका.” सध्या सोशलाईट्स मध्ये अभिनंदन हिरो झालेले आहेत. त्याचाच काहीजण गैरवापर करत आहेत.
