बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला
मुंबई, दि. २१: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल आज जाहीर झाला. या निकालाची आकडेवारी आज जाहीर करण्यात आली. यंदाच्या वर्षी बारावीचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. ९७.५१ टक्के निकालासह सालाबादप्रमाणे यंदाही कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर ९१.९५ टक्क्यांसह मुंबई विभागाने शेवटचं स्थान पटकावलं आहे. एकूण ९५.४४ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत तर उत्तीर्ण मुलांची निकालाची टक्कवारी ९१.६० टक्के इतकी आहे. बारावीच्या निकालात मुलांना मागे टाकत मुलींनी बाजी मारल्याचे चित्र यंदाही पाहायला मिळत आहे.
विभागनिहाय निकाल
- कोकण : ९७.५१ टक्के
- पुणे : ९४.४४ टक्के
- कोल्हापूर : ९४.२४ टक्के
- अमरावती : ९३ टक्के
- छत्रपती संभाजीनगर : ९४.०८ टक्के
- नाशिक : ९४.७१ टक्के
- लातूर : ९२.३६ टक्के
- नागपूर : ९३.१२ टक्के
- मुंबई : ९१.९५ टक्के
