“राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर केंद्राकडून कुठलीही विचारणा नाही” – गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील
मुंबई, दि.२४: राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर केंद्राकडून कुठलीही विचारणा झालेली नाही. राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी केला आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते.
धार्मिक स्थळांवरच्या भोंग्याच्या संदर्भात राज्य सरकारनं उद्या बैठकीचं आयोजन केलं आहे. त्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह विविध राजकीय पक्षांना बोलविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या वाहनावर काल झालेल्या हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली आहे. सध्या मुंबई पोलिसांचा सर्वात वाईट काळ सुरू आहे. झेड दर्जाची सुरक्षा व्यवस्था असलेल्या व्यक्तीच्या संरक्षणातही ते अपयशी ठरत असल्याचं ते म्हणाले.
Source-AIR
