FIH प्रो लिग हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची जर्मनीवर मात
भारतीय पुरुष हॉकी संघानं काल भुवनेश्वर इथल्या कलिंगा स्टेडियमवर एफ आय एच प्रो लीगमधील सामन्यात जर्मनीचा 3-1 असा पराभव केला. भारतानं जर्मनीविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले. या विजयासह, अमित रोहिदासच्या नेतृत्वाखालील भारतीय पुरुष हॉकी संघ सध्या 12 सामन्यांत 27 गुणांसह तालिकेत पहिल्या स्थानावर आहे.