Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

FIH हॉकी लीगमध्ये भारताचा ३-२ ने अर्जेंटिनावर विजय

FIH हॉकी लीगमध्ये भारताचा ३-२ ने अर्जेंटिनावर विजय

FIH हॉकी लीगमध्ये आज ब्युनॉस आयर्समध्ये झालेल्या सामन्यात भारताने अर्जेन्टिनाचा ३-२ असा पराभव केला. अत्यंत चुरशीनं झालेल्या या सामन्यात हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली.

त्यांनतर अर्जेंटिनाच्या मार्टिन फिरेरियो यानं लागोपाठ दोन गोल करून आघाडी मिळवून दिली. सामना संपायला केवळ सहा सेकंद बाकी असताना भारतानं आणखी एक गोल करत बरोबरी केली. पेनल्टी शूट आउटमध्ये आणखी एक गोल करून आणि गोलकीपर पी आर श्रीजेशच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर  भारताने विजय मिळवला. या विजयामुळे भारताचे सात सामन्यातून १२ गुण झाल्याने भारत पाचव्या स्थानावर पोहोचला. या दोन्ही संघात उद्या आणखी एक सामना होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *