आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारताचा सामना दक्षिण कोरियाशी
इंडोनेशियामध्ये जकार्ता इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघाचा सामना आज दक्षिण कोरियाशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळाला तर भारताचं अंतिम फेरीतील स्थान पक्क होणार आहे. या आधी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने जपानला २-१ अशा फरकाने पराभूत केलं असून मलेशियाला ३-३ अशा बरोबरीत रोखलं आहे. आता आजचा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.