Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

हिंगणघाट जाळीत कांडातील पिडितेच्या नातेवाईकांना सरकार नोकरी देणार

हिंगणघाट जाळीत कांडातील पिडितेच्या नातेवाईकांना सरकार नोकरी देणार

वर्धा/मुंबई: महाराष्ट्रात वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथे अंगावर पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या प्राध्यापिकेचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पिडितेला वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करूनही ती वाचू शकली नाही, याचे दुःख वाटते असल्याची प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. पिडीत मुलीच्या घरातल्या एकाला शासकीय नोकरी देण्याचं आश्वासनही देखमुख यांनी दिले आहे. तर या प्रकरणात सरकारी वकील म्हणून काम पहात असलेले वकील उज्वल निकम यांनी हा खटला फास्ट ट्रॅकवर चालविण्याची तयारी सुरु केली असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पिडीतेच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकार गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करेल असे आश्वासनही त्यांनी दिलं आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *