Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंघणघाट जळीत खटल्यासाठी विशेष सरकारी वकील अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

आरोपीला कठोरात कठोर शिक्षेसाठी प्रयत्न – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : हिंगणघाट जळीत हत्याप्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अँड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने आणि खटला जलद गतीने चालेल यावर कटाक्ष असेल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

आरोपीला गुन्ह्याची शिक्षा मिळालीच पाहिजे. त्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, यासाठी तपास यंत्रणा काम करेल.

अशा घटनेत तपासात कुचाराई होऊ दिली जाणार नाही. पीडीता, तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल यासाठी शासनाचे संबंधित विभाग समन्वयाने काम करतील. खटला वेगाने आणि दोषीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशा रितीने चालविण्यात येईल. त्यासाठी अँड. निकम यांची नियुक्ती करण्यात येत आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *