मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची निवड
मुंबई: मुंबईचे पोलिस आयुक्त परमविर सिंग यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त पदाचा कार्यभार सांभाळतील. परमवीर सिंह यांच्याकडे गृह रक्षक दलाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे.
रजनीश शेठ यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलं असून संजय पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची जवाबदारी देण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली.
