बांग्लादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना ४ दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत दाखल
नवी दिल्ली, दि. ५ : बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसिना चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी आज नवी दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज संध्याकाळी त्या परराष्ट्रव्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी चर्चा करतील. शेख हसिना उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचीही त्या भेट घेणार आहेत. शेजारी राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायला आपण नेहमीच महत्त्व आणि प्राधान्य देतो, असं त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.
दोन देशातल्या भू सीमा, सागरी सीमा, निर्वासित, आणि इतर समस्या संवाद आणि चर्चेच्या माध्यमातून सोडवल्याचं त्या म्हणाल्या. कोविड १९ च्या काळात भारतानं केलेल्या मदतीबद्दल त्यांनी आभार मानले. या आधी शेख हसिना ऑक्टोबर २०१९ मधे भारतात आल्या होत्या.

