सौदी अरेबिया सरकारचा निर्णय
सौदी अरेबियानं यंदाही हज यात्रा आपल्या नागरिकांपुरतीच मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीही हज यात्रेला येण्याची सौदी अरेबिया बाहेरील व्यक्तींना परवानगी नव्हती. यंदाही १८ ते ६० या वयोगटातील ६० हजार सौदी नागरिकच हज यात्रेत सहभागी होऊ शकतील.
त्याकरता लसीकरण करून घेण्याची अटही असल्याचं सौदी अरेबियाच्या अधिकृत वृत्त संस्थेनं दिलेल्या बातमीत म्हटलं आहे. जगभरातील कोविड स्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं सौदी अरेबियाचे आरोग्यमंत्री तौफिक अल रबिया यांनी सांगितलं.
Source – AIR
