हज समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांची माहिती
यंदाच्या वर्षी होणाऱ्या हज यात्रेमध्ये किती यात्रेकरूंना सहभागी होता येईल याविषयीचा निर्णय येत्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. सौदी अरेबियाने हज यात्रेसाठी मर्यादित संख्येत यात्रेकरू पाठवण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभुमीवर, हज यात्रेकरूंच्या संख्येबाबत काही ठोस निर्णय झाला नसल्याचे हज समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे कळते.
ज्या यात्रेकरूंनी कोविड १९ प्रतिबंधक लस पूर्ण केली आहे अशाच यात्रेकरूंनाच यात्रेची परवानगी देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. यंदा जम्मू आणि काश्मीरच्या ८ हजार लोकांनी यात्रेसाठी नोंदणी केली आहे.
