Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बनावट जीएसटी पावत्या जारी करून ११.६१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, पालघर आयुक्तालयाने एकाला केली अटक

बनावट जीएसटी पावत्या जारी करून ११.६१ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन शुल्क, पालघर आयुक्तालयाने एकाला केली अटक

पालघर, दि. १०: पालघर आयुक्तालय, मुंबई विभागाच्या तपास शाखेच्या अधिकाऱ्यांनी, बनावट पावत्या तयार करणाऱ्या एका टोळीचा छडा लावला आहे , ज्यामध्ये ११.६१ कोटी रुपये इतक्या अपात्र आयटीसीचा लाभ मिळवून  दुसऱ्याकडे  देण्यात आला. याप्रकरणी  हॅकनप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नीलेश बी. शहा याला ८.०२.२०२४ रोजी अटक करण्यात आली आहे.

गुप्तचर  विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे हॅकनअप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात तपास सुरू करण्यात आला. तपासादरम्यान ही कंपनी अस्तित्वात नसल्याचे आढळून आले. नीलेश बी. शहा यांचा जबाब नोंदवण्यात आला आणि त्यांच्या जबानीत त्यांनी कबूल केले की हॅकनअप ट्रेडिंग  प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर अनेक बनावट कंपन्यांच्या  निर्मितीमध्ये त्याचा सहभाग होता , ज्या किरण कंथारिया याच्या सूचनांनुसार अपात्र आयटीसी मिळवणे आणि दुसऱ्याला देण्याचे काम करत होत्या.

हॅकनअप ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेडने कुठल्याही वस्तू आणि/किंवा सेवांचा पुरवठा न करता बनावट बिलांच्या आधारे ३.९० कोटी रुपये अपात्र आयटीसी दुसऱ्याला देत ७.७१ कोटी रुपये आयटीसी मिळवला. तपासादरम्यान गोळा केलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे, नीलेश बी. शहा याला सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा, २०१७ च्या कलम ६९ च्या तरतुदींअंतर्गत ८.०२.२०२४ रोजी अटक करण्यात आली.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *