… आता नातवंडंही पळवू – गिरीश महाजन
फक्त मुलेच नव्हे, तर आता नातवंडेही पळवणार आहोत, असा इशारा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना दिला आहे.
एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या टिकेबद्दल प्रश्न विचारले असता, आता मुलेच नाही, तर नातवंडेही पळवू, असा इशारा महाजन यांनी दिला. त्यांची मुले, नातवंडे ते सांभाळू शकत नाहीत म्हणून त्यांची मुले आमच्याकडे येतात. विरोधकांनी स्वतःचे आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिला आहे. काही पक्षांमध्ये आमचं घर म्हणजेच आमचा पक्ष असे समीकरण असतं मग त्या पक्षातील कार्यकर्त्यांनी काय फक्त सतरंज्या उचलायच्या का? असाही टोलाही महाजन यांनी लगावला.
दरम्यान, धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नाना पटोले हे एकेकाळी आमच्या पक्षातील नेते होते, असे देखील गिरीश महाजन म्हणाले आहेत.
