Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

खुशखबर! डेक्कन क्वीनचा प्रवास होणार अर्ध्या तासाने कमी

खुशखबर! डेक्कन क्वीनचा प्रवास होणार अर्ध्या तासाने कमी

पुणे-मुंबईदरम्यान चालणारी डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीचा वेग येत्या काही दिवसात वाढणार आहे. डेक्कन क्वीन एक्सप्रेसने प्रवास करणारे प्रवासी नेहमीच्या वेळेपेक्षा आता अर्धा तास लवकर घरी पोहोचणार आहेत. डेक्कन क्वीन एक्स्प्रेसमध्ये नवीन लिंक होमन-बुश (एलएचबी) रेकचा वापर करण्यात येणार आहे. यामधील पुश अँड पुल या तंत्रज्ञानामुळे दोन्ही प्रवासाचे अंतर ३० ते ३५ मिनिटांनी कमी होणार आहे. येत्या काही महिन्यात हे नवीन रेक जोडले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डेक्कन क्वीन पुण्यातून दररोज सकाळी ७.१५ वाजता सुटते. आणि मुंबईत ती सकाळी १०.२५ला पोहचते. परतीच्या प्रवासात मुंबईतून ती संध्या.५.१० वाजता निघून पुण्यात रात्री ८.२५ वाजता दाखल होते. पुणे-मुंबई या प्रवासासाठी गाडीला सुमारे सव्वातीन तासांचा कालावधी लागतो. दुहेरी इंजिनमुळे हा कालावधी सुमारे पावणेतीन तासांवर येऊ शकतो. त्यामुळे सकाळी चाकरमानी वेळेवर कार्यालयात पोहोचून सायंकाळी घरीही सुमारे अर्धा तास लवकर पोहोचणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *