Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लोकसभा निवडणुकांच्या आधी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

लोकसभा निवडणुकांच्या आधी स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात १०० रुपयांची कपात

मुंबई/नवी दिल्ली, दि. ८: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. महिला दिनाचं औचित्य साधून स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रतिसिलेंडर १०० रुपयांनी कमी केल्याची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली आहे. आज मध्यरात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. त्यामुळं मुंबईत स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडर ८०२ रुपये ५० पैशांना मिळेल. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना हा सिलेंडर ५०२ रुपये ५० पैशांना मिळेल. या निर्णयामुळे महिलांचं दैनंदिन आयुष्य सुकर होईल, तसंच कोट्यावधि कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळेल आणि पर्यावरणसंरक्षणात हातभार लागेल असं प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *