जाणून घ्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत नेमकी किती रुपयांची वाढ झालीय
मुंबई, दि. ०१: लोकसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारकडून गॅसचे दर कमी करण्यात आले होते. पण निवडणुकांचे निकाल लागले आणि गॅस दर वाढीचे शुक्लकाष्ठ सुरु झाले. आज पुन्हा एकदा व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली. याआधी गेल्या महिन्यात ८ रुपये ५० पैशांनी एलपीजी गॅसच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या, तर जुलैमध्ये गॅस सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले होते.
