“ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणे आवश्यक” – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
नागपूर: ग्रामीण भागातले उद्योग बळकट करणं आवश्यक असल्याचं, केंद्रीय सुक्ष्म लघू आणि मध्यम उद्योग एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर येथे भारतीय जनता पक्षाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.
शहर आणि जिल्ह्यात प्रत्येकी दहा हजार रोजगार आपण उपलब्ध करून देऊ शकू काय, यासाठी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत, सेवा आणि विकासाचं राजकारण करून आत्मनिर्भर भारताची संकल्पना साकार करावी, असं आवाहन गडकरी यांनी यावेळी केलं. ग्रामीण भागातले लोक रोजगारासाठी शहराकडे येतात त्यांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध झाला, तर ते शहराकडे धाव घेणार नाहीत, याकडे गडकरीयांनी लक्ष वेधलं.
