Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या ३ कर्मचाऱ्यांना कोठडी

बनावट कागदपत्रांच्या आधारे आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नगरपरिषदेच्या ३ कर्मचाऱ्यांना कोठडी

बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो दस्तनोंदणी करुन आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातल्या धर्माबाद नगर परिषदेमधल्या तीन कर्मचाऱ्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

धर्माबाद नगर परिषदेच्या  काही कर्मचारी आणि शहरातल्या दलालांनी  संगनमत करून  बनावट कागदपत्रांच्या आधारावर शहरातल्या विविध मालमत्तेचं दस्तनोंदणी करून घेतली, तसेच तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश देवरे यांची दिशाभूल करून बनावट कागदपत्रांवर त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या होत्या. देवरे यांनी याप्रकरणी चौकशी समिती नेमली असता, त्यामध्ये पालिकेतले चार कर्मचारी आणि बिलोली नगर परिषदेतला एक कर्मचारी दोषी असल्याचं आढळून आले होतं. या प्रकरणातले इतर तीन आरोपी फरार असून,त्यांचा शोध सुरु आहे.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *