Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

“श्री मुंडगावकर ज्वेलर्सच्या मालमत्तांची विल्हेवाट लावून गुंतवणूकदारांना रक्कम वितरीत करणार”

मुंडगावकर ज्वेलर्स फसवणूकप्रकरणी गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची माहिती

मुंबई, दि.१०: अकोला येथील मुंडगावकर ज्वेलर्स, न्यू मुंडगावकर ज्वेलर्स, श्री मुंडगावकर ज्वेलर्सच्या प्रोप्रायटर यांच्याकडून फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना संरक्षित केलेल्या मुंडगावकर कुटुंबातील व्यक्तिच्या स्थावर मालमत्तांची विल्हेवाट लावून त्यातून आलेली रक्कम वितरित करण्यात येईल, असे माहिती गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेवर उत्तर देताना सांगितले.

राज्यमंत्री देसाई म्हणाले, व्याजाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या ४२७ तक्रारी दाखल झाल्या असून १६ कोटी रूपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी २ आरोपींची निष्पन्न झालेली स्थावर मालमत्ता संरक्षीत करण्यात आली आहे. तर उर्वरित जणांची मालमत्ता निष्पन्न करून त्यास संरक्षित करण्यात येईल. या मालमत्तेच्या नियंत्रणासाठी राज्य शासनाच्या वतीने सक्षम प्राधिकारी नियुक्ती करण्यात येईल. त्यामार्फत या मालमत्तांची विल्हेवाट लावून आलेली रक्कम गुंतवणूकदारांना वितरित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी या चर्चेत सहभाग घेतला.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *