Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

लैंगिक शोषण प्रकरणी ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात एफआयआर दाखल होणार

दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका

नवी दिल्ली, दि. २८: दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंच्या याचिकेवर शुक्रवारी (२८ एप्रिल) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यादरम्यान दिल्ली पोलिसांच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितले की, ब्रिजभूषण सिंह यांच्यावरील आरोपांसंदर्भात आज एफआयआर नोंदवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

यानंतर अधिवक्ता कपिल सिब्बल यांनी पैलवानांची बाजू मांडत सुरक्षेची मागणी केली. तसेच तपासासाठी एसटीएफ स्थापन करण्याची विनंती केली. यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले की, हे प्रकरण दिल्ली पोलीस आयुक्तांवर सोडले पाहिजे. सिब्बल म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखाली तपास व्हायला हवा. यावर तुषार मेहता म्हणाले की, आता ही मागणी थोडी जास्त आहे. पोलीस आयुक्त हे जबाबदार अधिकारी आहेत.

यानंतर सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की सॉलिसिटर जनरल, आम्ही तुमचे म्हणणे रेकॉर्ड करतो. १ आठवड्यानंतर आम्हाला अधिक माहिती दिली पाहिजे. त्यावर सॉलिसिटर जनरल म्हणाले की, हे योग्य नाही. प्रत्येक प्रकरणात, न्यायालय किंवा माजी न्यायाधीशांच्या थेट देखरेखीची मागणी केली जाते. कदाचित त्यांच्या नावावर आणखी काही सुरू आहे हे खुद्द खेळाडूंनाच माहीत नसेल.

सरन्यायाधीश म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवण्याबाबत म्हटले आहे. तपासासाठी एसटीएफ तयार करण्याबाबत आम्ही सध्या काहीही बोलत नाही. अल्पवयीन खेळाडूवरील धोक्याचा आढावा घेऊन पोलीस आयुक्तांनी त्याला संरक्षण द्यावे, असे ते म्हणाले. इतर खेळाडूंच्या सुरक्षेचाही आढावा घेतला पाहिजे. येत्या शुक्रवारी या प्रकरणावर पुन्हा सुनावणी होणार आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *