महाराष्ट्रातील नवनिर्वाचित एकनाथ शिंदे सरकारची बहुमत चाचणी ३ व ४ तारखेला होणार
मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठकीनंतर सचिव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. तर आपल्यासोबत पुन्हा काम करण्याची संधी मिळाली आहे; गतिशीलतेने आणि निर्णय क्षमतेने महाराष्ट्र पुढे नेऊया असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीत उद्या आणि परवा विधिमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पण आता अधिवेशन ३ व ४ तारखेला होणार आहे. अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार असून राज्यपालांनी शिंदे सरकारला उद्याच बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे. कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील खरीप हंगाम पीक पाणी, पीक विमा आणि राज्यातील कोरोना प्रादुर्भावाबाबतच्या परिस्थितीचं सादरीकरण करण्यात आलं.
