आज सायंकाळी होणार शपथविधी
मुंबई, दि. ३० : काल उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला व एकनाथ शिंदे यांचं बंड यशस्वी झालं असं म्हणणं वावगं ठरणार नाही. याच पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील अशी अटकळ होती. पण हे सारे अंदाज खोटे ठरवत देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील अशी घोषणा केली व साऱ्यांनाच धक्का दिला. यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की मी सत्तेबाहेर राहीन. कोणतंही मंत्रिपद स्वीकारणार नाही.
आज फक्त एकनाथ शिंदे यांचा शपथविधी होणार असून उर्वरित आमदारांचा शपथविधी हा भाजप व बंडखोर शिवसेना नेत्यांच्या बैठकीनंतर काही दिवसात होईल. एकूणच या साऱ्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे.
