“विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना वाऱ्यावर सोडणार नाही” – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
पालघर, दि. १३: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये प्रचारसभा घेतली. लाडकी बहिण योजना बंद पडावी म्हणून सावत्र भावांनी खूप प्रयत्न केले. मात्र आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही, असं ते म्हणाले. पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना यावेळी उमेदवारी दिली नसली तरी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन शिंदे यांनी यावेळी दिलं.
