एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार
नवी दिल्ली, दि. ११: एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या याचिकेत, संस्थेवर मणिपूर सरकारने दाखल केलेल्या प्राथमिक माहिती अहवालांशी संबधित दंडात्मक कारवाईपासून संरक्षण मागितलं आहे. गेल्या आठवड्यात एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाच्या चार सदस्यांवर ११ सप्टेंबर म्हणजे आजपर्यत कोणतीही कठोर पावलं उचलू नयेत असं उच्च न्यायालयाने आधीच स्पष्ट केलं आहे. मणिपूरमधल्या परिस्थितीसंदर्भात चुकीचा आणि पक्षपाती अहवाल दिल्याच्या आरोपावरुन मणिपूर सरकारने एडिटर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि तीन सदस्यांवर एफआयआर दाखल केला हेता.
