अनिल देशमुख यांच्या ईडी कोठडीत १५ नोव्हेंबर पर्यंत वाढ
मुंबईच्या विशेष न्यायालयानं माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोठडी 15 नोव्हेंबर पर्यंत वाढवली आहे. कथित भ्रष्टाचार प्रकरणी देशमुख यांना ईडीनं या महिन्याच्या 1 तारखेला अटक केली होती. तांत्रिक कारणांमुळे देशमुख यांची नीट चौकशी करता आली नाही म्हणून त्यांची कोठडी तीन दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी ईडीनं केली होती, ही मागणी न्यायालयानं ग्राह्य मानली आणि देशमुख यांची कोठडी वाढवण्यात आली. दरम्यान ईडीच्या कोठडीत आपण दिलेली जबानी आपल्याला मागे घ्यायचं आहे, अशी विनंती देशमुख यांनी न्यायालयाला केली.
