तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांना ‘ईडी’ कडून अटक
चेन्नई, दि. १४: तामिळनाडूचे ऊर्जामंत्री सेंथिल बालाजी यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्याची शिफारस ओमेंडूर सरकारी रुग्णालयानं केली आहे. त्यांच्यावर आज सकाळापासून या रुग्णालयात उपचार सुरु होते. काल १६ तासाच्या चौकशीनंतर आज सकाळी तामिळनाडूचे ऊर्जा मंत्री सेंथिल बालाजी यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे. त्यांच्या छातीत दुखु लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन आणि इतर मंत्री आणि डीएमके च्या संसद सदस्यांनी सेंथिल बालाजी रुग्णालयात भेट घेतली. भाजपा सरकार राजकीय द्वेषाचं राजकारण करत असल्याचं मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान इतर विरोधी पक्षांनीही या अटकेचा निषेध केला असून भाजपा केंद्रिय संस्थाचा गैरवापर करत असल्याचाही आरोप केला आहे. सेंथिल यांच्यावर ते एआयडीएमके पक्षाच्या सरकारमध्ये मंत्री असतांना नोकरीसाठी पैसे घेतल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांच्यावर कारवाई करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं दिली होती.
Source – AIR
