Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीचे छापे

अनुचित प्रकार टाळण्यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

कोल्हापूर, दि. ११: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल इथल्या निवासस्थानी, सक्तवसुली संचालनालय – ईडीनं आज छापे मारले. गेल्या दीड महिन्यात सलग तिसऱ्यांदा ही छापेमारी झाली. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित ४० कोटी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा बँकेतल्या काही खात्यांचाही तपास करण्यात येत असून यासंदर्भात इडीने बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पाच जणांना ताब्यात घेतलं होतं.

दोन दिवसांपूर्वीच जिल्हा बँकेचं लेखा परीक्षण करण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत. मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीकडून ३५ कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात, तसंच मुरगूड पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा रद्द करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, या छापेमारीमुळे सध्या एकच खळबळ उडाली असून, मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी बंगल्याच्या बाहेर ठाण मांडून मुश्रीफ यांच्या नावे घोषणा सुरू केल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

Source – AIR

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *