हिंगोली, नांदेड आणि वाशिम जिल्ह्यांना बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने नागरिकांत घबराट
नांदेड: हिंगोली, नांदेड आणि वाशिम जिल्ह्यात काल सकाळी ८ वाजून ३३ मिनिटांच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. त्याची तीव्रता ४ पूर्णांक ४ रिश्टर स्केल नोंदवली गेली. घरातील सामान हलल्यामुळे तसंच भूगर्भातून मोठा आवाज आल्यानं नागरिक घाबरून घराबाहेर पडले.
यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू यवतमाळच्या महागाव तालुक्यातील मुडोना आणि साधूनगर परिसरात होता. भूकंपाचे केंद्र यवतमाळ जिल्ह्यात असलं तरी धक्के जाणवले नसल्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी काल केलं.
