बांग्लादेशी नागरिकांना बनावट पासपोर्ट देणाऱ्या ८ आरोपींना ‘एटीएस’ ने केली अटक
बांग्लादेश नागरिकांना बनावट पारपत्र देणाऱ्या ८ आरोपींना महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकांनं मुंबईतून अटक केली आहे. या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे या पथकानं मुंबईत धाड टाकून या टोळीला अटक केली.
या टोळीकडून बनावट पारपत्र बनवण्यासाठी लागणारी कागदपत्र, यंत्रसामुग्री, मोठ्या प्रमाणावर बांग्लादेशी चलन, बनावट आधार कार्ड, बनावट शिक्के आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत.
या टोळी विरोधात पोलिसांनी काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
