Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा; अशी करा नाव नोंदणी

द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे रायगड जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा; अशी करा नाव नोंदणी

उरण दि. २४(विठ्ठल ममताबादे): द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशन-उरण यांच्या विद्यमाने २० वा युवा महोत्सव २०२१ अंतर्गत बुधवार दि.०३ मार्च २०२१ रोजी सायं. ठीक ५ – ०० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान, ता. उरण, जि. रायगड येथे काव्य-स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही. तसेच विषयाचे बंधन नाही. परंतु विषय राजकीय तेढ निर्माण करणारा, कुणाच्या भावना दुखावणारा आणि अश्‍लील नसावा. कविता स्वरचित व मराठीत असावी. स्पर्धक रायगड जिल्ह्यातील असावा. कविता सादरीकरणाची वेळ फक्त साडे तीन मिनिटे असेल. बक्षिसे- प्रथम- रू.१५००/- द्वितीय- रू.१३००/- तृतीय- रू.११००/- आणि उत्तेजनार्थ: प्रथम- रू. ५५०/- द्वितीय- रू.४५०/- तृतीय- रू. ३५०/- आणि सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येतील. तसेच सर्व भागधारकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील. ज्या स्पर्धकांना भाग घ्यायचा आहे, त्यांनी खाली दिलेल्या नंबर पैकी फक्त एका नंबरशी संपर्क साधून आपले नाव दि. ०२ मार्च. सायंकाळी ५ – ०० वाजेपर्यंत नोंदवावे. स्पर्धेत भाग घ्यावा. स्पर्धेचा निकाल आणि बक्षीस वितरण लगेचच होईल.

अध्यक्ष – महादेव घरत,
सचिव – दिलीप तांडेल,

संपर्क- नियोजक/संयोजक- दर्शना माळी -(९८३३७७५४१४), रोहन घरत-(९८१९३९१२१२), संजय होळकर-(९२७०३६७७८८),
राम म्हात्रे-(९९३०८७४०३२),
भ. पो. म्हात्रे-(९८१९५०९५९५०६), कार्यालय- (०२२२७२२४४९८).
स्पर्धा प्रमुख/सूत्रसंचालक- कविश्री. अरुण दत्ताराम म्हात्रे. (९९८७९९२५१९)

(कार्यक्रमात फेरफार करण्याचा अधिकार अध्यक्ष/कमिटी यांचा राहील. तसेच परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल. नाका-तोंडाला मास्क/रुमाल लावावा, सामाजिक अंतर पाळावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.)

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *