प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट
मुंबई दि. ३ : प्रधानमंत्र्यांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी गणरायाचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन डोवाल यांचे स्वागत केले. याभेटी दरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. या नंतर अजित कुमार डोवल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची मुंबईतल्या राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.
