वादग्रस्त : दिग्विजय सिंग यांनी पुलवामा दहशतवादी हल्याला संबोधले ‘दुर्घटना’
आपल्या वादग्रस्त विधांनासाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी आज पुन्हा एकवार त्याची प्रचिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आरोप करताना एका ट्विट मध्ये त्यांनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख पुलवामा ‘दुर्घटना’ असा केला आहे. ते म्हणतात की, “पुलवामा दुर्घटनेनंतर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राईक नंतर काही विदेशी माध्यमांनी शंका उपस्थित केल्या. ज्यामुळे भारत सरकार च्या विश्वासनियतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे” तसेच ते पुढे म्हणतात, “एकीकडे आपले काही मंत्री ह्या हवाई हल्ल्यात ३०० दहशतवादी मारले गेले असे म्हणत आहेत तर भाजप अध्यक्ष आणि योगी आदित्यनाथ अनुक्रमे २५० व ४०० ठार झाल्याचे म्हणत आहेत. आपले एक मंत्री एस. एस. अहलुवालिया म्हणतात की एकही दहशतवादी मारला गेला नाहीये. आपण ह्या विषयावर मौन बाळगून आहात. देश जाणू इच्छितो की ह्या सर्वांत खोटं कोण आहे.” दिग्विजय सिंग यांनी आज जे ट्विट केले आहे ते आम्ही येथे देत आहोत. पण खरा प्रश्न हा की दिग्विजय सिंग यांनी चुकून पुलवामा हल्ल्याचा उल्लेख दुर्घटना असा केलाय की जाणून बुजून. सध्या ते काँग्रेस मध्येही अडगळीत पडून आहेत. त्यांच्या अशा विधानांमुळे बहुतेक काँग्रेस नेतृत्व मणिशंकर अय्यर तसेच त्यांच्यापासून अंतर राखू इच्छितंय.
किन्तु पुलवामा दुर्घटना के बाद हमारी वायु सेना द्वारा की गयी “Air Strike" के बाद कुछ विदेशी मीडिया में संदेह पैदा किया जा रहा है जिससे हमारी भारत सरकार की विश्वसनीयता पर भी प्रश्न चिन्ह लग रहा है।
— Digvijaya Singh (@digvijaya_28) March 5, 2019
