Breaking News

महाराष्ट्र वार्ता च्या ‘आपली समस्या’ टीम ला 8850303463 वर व्हाट्सअप्प द्वारे संपर्क साधा | WhatsApp Maharashtra Varta’s ‘Aapli Samasya’ Team on 8850303463

धारावीतील १३ रुग्णांचा आला होता दिल्लीतील मरकज रिटर्न तब्लिघीशी संबंध

धारावीतील १३ रुग्णांचा आला होता दिल्लीतील मरकज रिटर्न तब्लिघीशी संबंध

मुंबई: आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी परिसरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. एकट्या धारावीत १३ रुग्ण सापडले असून या साऱ्यांचे मरकज कनेक्शन आता समोर आले आहे. जे १३ रुग्ण सापडले आहेत ते दिल्लीतील मरकज च्या कार्यक्रमातून परतलेल्या इसमाच्या संपर्कात आले असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.

या सर्वांना कोरोनाचा लागण स्थानिक मस्जिदितून या रुग्णामार्फत झाल्याचे कळते. राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसतेय त्यातही मुंबईची टक्केवारी ही ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. या पूर्वी मुंबई महानगरपालिकेने धारावी व वरळी कोळीवाडा परिसर पूर्ण सील केला आहे.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक पेज ला लाईक करा

Facebook Pagelike Widget

Recommended For You

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *