सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे झाले कोरोनामुक्त; मिळाला डिस्चार्ज
मुंबई: सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आज कोरोनामुक्त होऊन घरी गेले. यावेळी त्यांनी ट्विट करत डॉक्टर्स, नर्स, हॉस्पिटल कर्मचारी, सर्व सहकारी व हितचिंतकांचे आभार मानले. ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, “सर्वांच्या आशीर्वादाने आणि प्रेमाने मी कोरोनावर मात करण्यात यशस्वी झालो. आज डिस्चार्ज मिळाला. रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्स आणि इतर कर्मचाऱ्यांनी माझी काळजी घेतली. सगळ्यांचे मनापासून आभार🙏
हलगर्जीपणा करू नका, सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. आपण कोरोनारुपी संकटावर नक्की मात करू.”
