येडं पेरलं आणि खुळं उगवलं’, धनंजय मुंडेंनी उडवली दानवेंची खिल्ली
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात सध्या अनॆक गंमतीशीर गोष्टी पाहावयास मिळत आहे. ट्विटरच्या माध्यमातून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाचे नवीन खेळ सुरु आहेत. भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे काही दिवसांपूर्वी बोलताना जवानांना अतिरेकी आणि विंग कमांडर अभिनंद वर्धमान यांना हेलिकॉप्टर पायलट बोलत घोड चूक केली होती.
मागील आठवड्यात त्यांनी पाकिस्तानने पुलवामा हल्ल्यामध्ये भारताचे ४० अतिरेकी मारले असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे विरोधकांसह नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर खिल्ली उडवली होती.
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दानवेंच्या चुकलेल्या विधानाचा संदर्भ घेत ट्विटरवरून दानवेंचा चांगलाच समाचार घेतला आहे.
धनंजय मुंडे ट्विटमध्ये म्हणतात की, यांना विंग कमांडर आणि पायलट यातला फरक कळत नाही. मिग-२१ आणि हेलिकॉप्टर यातला फरक कळत नाही आणि झालेत प्रदेशाध्यक्ष अशा शब्दात त्यांनी दानवेंवर टीका केली. ‘येडं पेरलं आणि खुळं उगवलं’ अशी गत आहे सगळी. असा खोचक टोमणाही त्यांनी दानवेना मारला.
