नातवाची उमेदवारी जाहीर करताना आजोबांना रडू अनावर
देशाचे माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी त्यांच्या नातवाला राजकारणाच्या आखाड्यात उतरवत असल्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करत असताना ते मंचावरच रडत होते. देवेगौडा यांचा नातू प्रज्वल रेवण्णा हे हासन लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. जनता दल सेक्युलरकडून प्रज्वल रेवण्णा यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती देवेगौडा यांनी दिली.
तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी हासन मतदारसंघासाठी प्रज्वलला निवडले असल्याचे देवेगौडा यांनी जाहीर केले. मात्र हे सांगत असताना देवेगौडा यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आजोबाना पाहून नातू प्रज्वल रेवण्णा याचाही अश्रूंचा बांध कार्यकर्त्यांसमोर फुटला.
