दिल्लीतील जहांगिरपुरी येथे झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी २१ जणांना अटक
दिल्ली: दिल्लीतील जहांगिरपुरी इथं झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणी आतापर्यंत २१ जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेदरम्यान आठ पोलीस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक जखमी झाले आहेत. अटक केलेल्या २१ जणांमध्ये अन्सर आणि अस्लम या मुख्य आरोपींसह दोन अल्पवयीन आरोपींचाही समावेश आहे. अशी माहिती पोलिस उपायुक्त उषा रंगनानी यांनी दिली. जिल्हा पोलिस आणि गुन्हे शाखा संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. अशी माहिती दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेचे विशेष आयुक्त रवींद्र यादव यांनी सांगितलं.
Source-AIR
