चक्क दोन प्रतिस्पर्धी एकाच वेळी एकाच मंदिरात…
पुणे : निवडणुका म्हटल्या की आरोप प्रत्यारोप, देवाला नवस बोलणे हे आपल्यासाठी काही नवीन राहीलं नाही. पण पुण्यामध्ये चक्क दोन प्रतिस्पर्धी एकाचवेळी एकाच मंदिरात साकडे घालायला गेले.
लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन उमेदवार पार्थ पवार आणि शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे ह्या दोन्ही उमेदवारांनी आज एकाच देवाला साकडं घातलं.
तुकाराम बीजनिमित्त आज देहूमध्ये वारकरी संप्रदाय जमला आहे. तिथेच पार्थ पवार आणि श्रीरंग बारणे यांनी एकाच वेळी लोकसभेत निवडून यावे म्हणून साकडं घातलं.
आता तुकोबा कोणाला प्रसन्न होतो हे निवडणुकीच्या निकाला दिवशीच कळेल.
