अब्रुनुकसानी प्रकरणी खासदार संजय राऊत यांना १५ दिवसांची कोठडी
मुंबई, दि. २६: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांना शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने आज १५ दिवसांची कोठडी आणि २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. मीरा भाईंदर शहरातल्या शौचालय कंत्राटावर केलेल्या विधानामुळे मेधा सोमय्या यांनी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता. मीरा भाईंदर पालिका क्षेत्रातली १५४ सार्वजनिक शौचालयं बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या संस्थेला मिळालं होतं. मात्र, या कंत्राटात घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना केला होता. दरम्यान न्यायलयाने संजय राऊत यांना जाहीर झालेल्या शिक्षेविरोधात सत्र न्यायलयात आवाहन देण्यासाठी ३० दिवसांची मुदत दिली असून या कालावधीपुरता जामीन त्यांना मंजूर केला आहे.
Source – AIR
